वाठार-रत्नागिरी हायवेवर, काखे फाटा येथे मनसेचा ‘ रास्ता रोको ‘
कोडोली प्रतिनिधी
वाठार- रत्नागिरी हायवे वरील काखे फाटा ता.पन्हाळा येथे मनसेच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. शहापूर, काखे, मोहरे, सातवे, आरळे येथील खराब झालेला रस्ता त्वरित दुरुस्त करण्यात यावा, यासाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी याबाबतचे PWD च्या वतीने PWD चे पन्हाळ्याचे शाखा अभियंता एम. एम. कोळी आणि जिल्हा परिषदचे बांधकाम अभियंता एम. एस. पाटील यांनी निवेदन स्विकारले. PWD चे कनिष्ठ अभियंता भाऊसाहेब हजारे यांना संपर्क साधला असता, हजारे यांनी दोन दिवसात खडीकरण करून घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर, रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. रस्ता रोकोमुळे वाठार रत्नागिरी वरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
यावेळी कोल्हापूर उपजिल्हा अध्यक्ष संतोष जाधव, जिल्हा महिला उपाध्यक्ष सिंधुताई शिंदे, तालुका अध्यक्ष मोहन शेळके, विध्यार्थी सेना कोडोली शहर अध्यक्ष संतोष पवार, शाहूवाडी तालुका अध्यक्ष बाळासाहेब कदम, तालुका अध्यक्ष सुरज निकम, शहर उपाध्यक्ष सत्यजित कुंभार, कोडोली शहर प्रमुख नयन गायकवाड, शहर उपाध्यक्ष सत्यजित कुंभार, रमेश मेनकर, प्रमोधिनी माने तसेच मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.