बांबवडे त बांधकाम सभापती सर्जेराव पाटील पेरीडकर यांचा वाढदिवस संपन्न
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम केडीसीसी बँकेचे संचालक व कोल्हापूर जिल्हापरिषदेचे बांधकाम सभापती श्री सर्जेराव पाटील पेरीडकर यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन प्रकाश पाटील आणि मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले होते.
आज दि.५ डिसेंबर रोजी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील पेरीडकर यांचा वाढदिवस आहे. यानिमित्त त्यांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात आले. त्याचबरोबर केक कापून वाढदिवस सुद्धा संपन्न करण्यात आला. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी सभापतींना शुभेच्छा दिल्या.
यावेळी महेश निकम, स्वप्नील घोडे-पाटील, प्रकाश पाटील, माजी सरपंच गजानन निकम, महादेव मूडशिंगकर, शामराव कांबळे, भगतसिंग चौगुले, तसेच प्राथमिक विद्यामंदिर चे विद्यार्थी , यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.