महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम!!!
बांबवडे : महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिना निमित्त त्यांना भावपूर्ण आदरांजली, आणि कोटी कोटी प्रणाम!!!
ह्या देशाचा कारभार ज्या पायाभूत मुल्यांवर सुरु आहे, अशा मूल्यांचे निर्माण आणि जतन ज्या व्यक्तीने करण्यास सांगितले, ते म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर.
या व्यक्तीने देशाला महान अशा मुल्यांचा ठेवा देवून, धार्मिकतेच्या नावावर सुरु असलेल्या अत्याचाराला पायबंद घातला. याच मुळे एक समाज अत्याचाराच्या अंधकारातून मुक्त झाला. डॉ.आंबेडकर यांची मुल्ये कोण एका समाजापुरती मर्यादित नव्हती, आणि नाही. ती आहेत प्रत्येक समाजातील शोषित आणि पिडीतांसाठी . म्हणूनच अशा महामानवाला कोटी कोटी प्रणाम!!!