मुलगा वंशाचा दिवा असला, तरी मुलगी ही पणती- सौ.आकांक्षा पाटील ( जिल्हा नियोजन समिती सदस्या )
मलकापूर प्रतिनिधी :
जन्माला आलेली मुलगी ही आपल्या असीम कर्तृत्वाने नवनवी क्षेत्र पादक्रांत करून आपले कर्तृत्व सिध्द करत आहे. म्हणूनच भेदभाव न मानता मुलीच्या जन्माचं स्वागत करणं गरजेचे असल्याच प्रतिपादन जिल्हा नियोजन समिती सदस्या आणि जि प सदस्या सौ आंकाक्षा पाटील यांनी आंबर्डे येथे आयोजित कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले .
न्यू दत्त तरूण मंडळ दत्तगल्ली यांच्या वतीने आयोजित केलेल्या ‘ बेटी पढाव बेटी बचाव ‘ कार्यक्रम अंतर्गत त्या बोलत होत्या. .अध्यक्षस्थानी शाहुवाडी पंचायत समितीच्या सभापती डॉ. सौ. स्नेहा जाधव या होत्या.
सौ आंकाक्षा पाटील पुढे म्हणाल्या कि, मुलगा, मुलगी भेदभाव न मानता, आपण आपली मानसिकता बदलने आवश्यक आहे. मुलगा वंशाचा दिवा असला, तरी मुलगी ही पणती आहे. आपल्या बौध्दीकतेच्या बळावर मुली यशोशिखरावर विराजमान झाल्या आहेत. दत्त तरूण मंडळाचा उपक्रम हा कौतुकास्पद आणि प्रेरणा दायी आहे .
सभापती डॉ.स्नेहा जाधव म्हणाल्या कि, आजच्या वास्तव जीवनाला एक नवी प्रेरणा आणि विचार धारा देणारा उपक्रम, दत्त तरूण मंडळाने राबवला असून, जन्माला येणाऱ्या नारी जातीला संघर्ष करावा लागत आहे. एक विशिष्ट विचार प्रणालीने मानसिकता बदलत चालली आहे. मात्र मुलीनी आपले कर्तृत्व दाखवून आपली गुणवत्ता सिध्द केली आहे .
या वेळी मुख्याध्यापिका सुनिता चव्हाण, दिपा परिट, सुरेखा परिट, सई कांबळे, अंकीता शिंदे, स्नेहल आगलावे, तेजल परिट यांनी मनोगत व्यक्त केले .
====यांचा झाला विशेष सत्कार ====
मुलगी दत्तक घेतल्या बद्दल सौ लक्ष्मी पांडूरंग उंड्रीकर , दोन मुलीवर कुटूंब नियोजन केल्याबद्दल सौ अस्मिता किरण पाटील तर आबंर्डे येथे दारूबंदी करण्यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या महिला प्रतिनीधी म्हणून अध्यक्षा सौ रूपाली उत्तम कांबळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला .
प्रारंभी मंडळाचे वतीन ‘ बेटी पढाव बेटी बचाव ‘ यासाठी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. विद्या मंदीर आंबर्डे, शिव पार्वती माध्यमिक विद्यालय आंबर्डे शाळेचे विद्यार्थी, युवक मंडळाचे कार्यकर्ते आदिनी जनजागृती फेरी काढली .
कार्यक्रमास माजी उपसभापती संगीता पाटील, सरपंच वैशाली माने, सर्व नुतन ग्रामपंचायत सदस्या , महीला बचत गट , अंगणवाडी सेविका , प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षक , शिक्षीका, गावातील महीला , मंडळाचे कार्यकर्ते आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते. सचिव बाळासाहेब पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर आभार महादेव पाटील यांनी मानले .