यशवंत हायस्कुल मध्ये ‘अपूर्व विज्ञान मेळावा ‘ उसाहात
कोडोली वार्ताहर
कोडोली ता.पन्हाळा येथील यशवंत प्रसारक मंडळ संचलित यशवंत हायस्कुल येथे गुरुवार दिनांक ७ ते शनिवार दिनांक ९-१२-२०१७ रोजी पर्यंत’अपूर्व विज्ञान मेळावा’आयोजित केला आहे. या’अपूर्व विज्ञान मेळाव्याचे उदघाटन पन्हाळा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सौ.एस.एस.सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
विध्यार्थ्यांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी त्यांच्या अंगी असणारे सुप्त गुण समजावेत, त्या गुणांचा विकास व्हावा, तसेच बालवैज्ञानिक तयार व्हावा, या उद्देशाने हे अपूर्व विज्ञान मेळावा ठेवल्याचे, यावेळी हायस्कुलचे प्राचार्य बी.डी.पाटील यांनी सांगितले. या सदर मेळाव्यात विज्ञानात छोटे छोटे १४० प्रयोग मांडण्यात आले आहेत. मेळाव्यानिमित्त रांगोळी, चित्रकला, हस्तकला व ग्रंथ प्रदर्शन ठेवण्यात आले आहेत. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन संदर्भांत हायस्कुलच्या विध्यार्थ्यांनी नाटिका ही सदर केली आहे. सदर ‘अपूर्व विज्ञान मेळाव्यास कोडोली परिसरातील शाळा, हायस्कुल यांनी भेट दिली असून, पालकांनीही मेळावा पाहण्यास गर्दी केली आहे. यावेळी ‘अपूर्व विज्ञान मेळावा’ उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्पती पुरस्कार प्राप्त नायब सुभेदार एस.जी.जाधव , कन्या विद्या मंदिरचे मुख्याध्यापक अशोक पाटील, तसेच प्राध्यापक वर्ग , संस्थेचे कर्मचारी, विध्यार्थी व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.