वारणानगर येथे वारणा कृषी प्रदर्शनास प्रारंभ
कोडोली वार्ताहर
वारणानगर ता.पन्हाळा येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही वारणा उद्योग समूह आयोजित, वारणा कृषी प्रदर्शन २०१७ चे उदघाटन माजी मंत्री डॉ.विनय कोरे व वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष भाऊसाहेब गुळवणी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. स्व.तात्यासाहेब कोरे स्मृतीपर्वकाळ निमित्त वारणा कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते.
यावर्षी कृषी प्रदर्शन ९ ते १३ डिसेंबर दरम्यान सुरू राहणार असून.या प्रदर्शनामध्ये खते, औषधें,बी बियाणे,औजारे याचा बरोबर यावर्षी राज्यभरातून आदर्श पशुधन देखील ठेवण्यात आले आहेत. यामध्ये गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या यांचा समावेश आहे. तसेच प्रदर्शन दरम्यान मनोरंजन कार्यक्रम व डॉग शोचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर १ टनाची गाडी ओढणारा कुत्रा, रंगीबेरंगी चिमण्या, कडकनाथ कोंबडी, लेजर तंत्रज्ञानाचे नांगर फाळ, परदेशी भाजीपाला व १ टनाचा बैल असे नाविन्यपूर्ण या प्रदर्शनामध्ये पहाण्यास मिळणार आहे. तसेच छ.शाहू महाराजांच्या जीवनावरील छायाचित्रांचे प्रदर्शन लाल बहादुर शास्त्री भवन मध्ये भरले आहे. या प्रदर्शन मध्ये तासवच लहान मुलांसाठी खेळणी व खाद्यजत्रा भरली आहे. पहिल्या दिवशी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या कृषी प्रदर्शनाचा लाभ घेतला. या उदघाटन प्रसंगी वारणा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, साखर कारखान्याचे एकीझिटिव्ह डायरेक्टर व्ही.एस.चव्हाण, प्रभारी कार्यकारी संचालक व्ही.एस.कोले, वारणा उद्योग समुहाचे अधिकारी, संचालक मंडळ, कर्मचारी उपस्थित होते.