परखंदळे मधील ५४० मतदान कमी होणार ?
बांबवडे : सध्या तालुक्यातील बऱ्याच गावातील मतदान दुबार होत असून, याचा गैफायदा घेतला जात आहे.
यासाठी परखंदळे तालुका शाहुवाडी येथील १६४०एकूण मतदान आहे. यापैकी ५४० मतदान गावच्या बाहेर आहे. हे मतदान मुंबई ,पुणे, इचलकरंजी,कोल्हापूर अशा ठिकाणी दुबार नोंद आहेत. तसेच काही मंडळींची नावे रेशन कार्ड ला देखील दुबार आहेत.
त्यामुळे अशांची नावे गावच्या मतदारयादीतून कमी व्हावीत,अशा पद्धतीची तक्रार तहसीलदार कार्यालयात करण्यात आली आहे. अशी माहिती श्री जोतीराम गुजर, भीमराव ईश्वरा दळवी, शामराव नामदेव पाटील, सर्जेराव रंगराव गिरी, वसंत बाबुराव दळवी, राजेश बळवंत पाटील यांनी दिली.