स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी पथनाट्य प्रेरणादायी -अॅलीस पोरे मुख्याधिकारी

मलकापूर प्रतिनिधी : मलकापूर नगरीला स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी, आणि आपल्या परिसराची स्वच्छता राखण्यासाठी कृतीतून पथनाट्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी दिलेला संदेश प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन मलकापूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी अॅलीस पोरे यांनी पथनाट्या च्या प्रारंभी केले.
स्वच्छ सर्व्हेक्षण मलकापूर या मोहिमेंतर्गत मलकापूर शहरात स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी पथनाट्याच्या माध्यमातून सादरीकरणातून करण्यात आले. मलकापूर नगरपरिषदेपासून या पथनाट्याला प्रारंभ करून शहरात चार ठिकाणी पथनाट्य सादर करण्यात आले.
मुख्याधिकारी अॅलीस पोरे, शहर कॉर्डीनेटर मेघास्वामी, ए.के. पाटील, आबा पडवळ, विजय पाटील, रुपेश वारंग, विनायक हिरवे, दस्तगीर आत्तार,सुलभा तांदळे यांच्यासह कर्मचारी यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला.
संपूर्ण मलकापूर शहरात स्वच्छ सर्वेक्षण मोहीम गतिमान करण्यात आली असून, स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याबरोबरच सुका व ओला कचरा विघटन याकडेही विशेष लक्ष दिले आहे. अधिकारी वर्ग, कर्मचारी, लोकप्रतिनिधी या सर्वांनी स्वच्छ सर्व्हेक्षण मोहीम राबवली आहे.
शालेय विद्यार्थी आर्या हिरवे, वरद कुंभार, सई तांदळे, अनुज खटावकर, आर्यन मळे, दीक्षा शेणवी,अभिनव हिरवे, या विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषेत आणि कृतीद्वारे स्वच्छते विषयी माहिती सादर केली. स्वच्छता दूत रुपेश वारंगे, विनायक हिरवे, आबा पडवळ, यांच्यासह दस्तगीर आत्तार,सुलभा तांदळे यांच्या संकल्पनेतून या पथनाट्याचे मलकापूर नगरपरिषद , सुभाष चौक, पेरीड नाका याठिकाणी पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले.

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!