शिक्षक मागणीच्या आंदोलनाला उपस्थित रहा- कृष्णात पाटील कानसा-वारणा फौंडेशन

बांबवडे : ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन ,कानसा वारणा फौंडेशन, शाहुवाडी शिक्षण संघर्ष कृती समिती यांच्यावतीने जिल्हा परिषदेच्या शाळेत रिक्त शिक्षकांच्या जागा त्वरित भराव्यात, यासाठी दि.१४ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वाजनेच्या दरम्यान जिल्हापरिषद कोल्हापूर इथ आंदोलन करण्यात येणार आहे.या आंदोलनास शाहुवाडीकरांसह तमाम जनतेने उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन कानसा वारणा फौंडेशन चे अध्यक्ष व विरळे गावचे सरपंच कृष्णात पाटील यांनी केले आहे.
भारतीय संविधान नुसार देशातील प्रत्येकाला मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळणे, हा त्या नागरिकांचा मुलभूत अधिकार आहे. जर समाजाची सर्वांगीण उन्नत्ती करायची असेल, तर देशातील प्रत्येक नागरिकाला शिक्षण मिळाले पाहिजे.
सध्याच्या शासकीय धोरणामुळे व वाढत्या खाजगीकरणामुळे शासकीय शाळेतील विद्यार्थी कमी होत आहेत. विद्यार्थ्यांना व पालकांना आकर्षित करणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा वारेमापपणे लुट करताना दिसत आहेत. आणि दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या शाळा मात्र ओस पडू लागल्यात.
आपल्या शाहुवाडी तालुक्यापुरता मर्यादित विचार केला, तरी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये संपूर्ण तालुक्यात १३९ शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. जून २०१७ मध्ये बदली करून तालुक्याबाहेर गेलेल्या शिक्षकांच्या जागी, दुसऱ्या शिक्षकांच्या नेमणुका केलेल्या नाहीत. त्यामुळे एकाच शिक्षकावर संपूर्ण शाळेची जबाबदारी पडते. अशी काही ठिकाणची विदारक परिस्थिती आहे. याचा परिणाम मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होवू लागला आहे. यासाठी शिक्षकांच्या नेमणुका व इतर ही मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी सर्व तालुकावासियांनी या आंदोलनास उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन चे गिरीश फोंडे, जिल्हा कौन्सिल हरीश कांबळे, जिल्हा सचिव प्रशांत आंबी, नितीन मुटल , महेंद्र पाटील, कानसा वारणा फौंडेशन चे अध्यक्ष कृष्णात पाटील यांनी केले आहे.

1+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!