…अन्यथा जिल्हा परिषद समोर बेमुदत उपोषण- कृष्णात पाटील
बांबवडे : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी त्वरित कार्यवाही करून तालुक्यातील शिक्षकांची रिक्त पदे लवकरात लवकर भरावीत, अन्यथा जिल्हापरिषदे समोर बेमुदत उपोषण करण्यात येईल. असा इशारा कानसा-वारणा फौंडेशन चे अध्यक्ष कृष्णात पाटील यांनी दिला आहे.
भारतीय संविधान नुसार देशातील प्रत्येक नागरिकाला मुक्त आणि सक्ती चे शिक्षण मिळालेच पाहिजे, हा त्यांचा मुलभूत अधिकार आहे. शाहुवाडी तालुक्यातील रिक्त शिक्षकांच्या जागांवर त्वरित शिक्षक भरले जावेत. अशी मागणी कानसा वारणा फौंडेशन चे अध्यक्ष कृष्णात पाटील यांनी आंदोलन द्वारे केली आहे.
दि.१४ डिसेंबर रोजी कोल्हापूर जिल्हा परिषदेवर कानसा वारणा फौंडेशन व ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन , इतर संघटनेच्या सोबत मोर्चा काढून निषेध व्यक्त करीत, रिक्त जागांवर त्वरित शिक्षक भरण्याची मागणीही करण्यात आली.
शाहुवाडी तालुक्यात एकूण शिक्षकांपैकी १५५ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. जून २०१७ मध्ये शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या झाल्या. त्यामुळे त्याठिकाण ची पदे रिक्त झालीत. परंतु त्या जागांवर शिक्षक भरणे , गरजेचे असतानाही त्या जागा अद्यापही रिक्त आहेत. तसेच काही ठिकाणी एकाच शिक्षकांवर संपूर्ण शाळेचा भार पडत आहे. अशी विदारक अवस्था तालुक्यात असतानाही पंचायत समिती, तसेच जिल्हा परिषद या घटनांकडे अजूनही दुर्लक्ष करीत आहे.
यावेळी कानसा वारणा फौंडेशन, ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन चे हरिष कांबळे, प्रशांत अंबी व ग्रामस्थ उपस्थित होते.