‘आवळी ‘ च्या ‘सरपंच ‘ पदी सौ.शिल्पा पाटील
पैजारवाडी प्रतिनिधी :-
आवळी (ता.पन्हाळा) येथील सरपंचपदी सौ.शिल्पा श्रीधर पाटील यांची बिनविरोध निवड झाली. गटांतर्गत ठरल्याप्रमाणे सरपंच सौ.कविता कदम यांनी राजीनामा दिल्यानंतर, रिक्त झालेल्या पदासाठी सौ.शिल्पा पाटील यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. निवणूक अधिकारी पन्हाळा मंडलंअधिकारी श्री. कोतेकर यांनी नूतन सरपंच सौ पाटील यांचा सत्कार केला.
या निवडी वेळी उपसरपंच नामदेव चौगुले, सदस्य अनिल पाटील, जयवंत कदम, शुभांगी क्षीरसागर , रुपाली पाटील, छाया पोवार यांच्यासह निवास पाटील, वसंत यादव, अशोक पाटील (मेजर), उत्तम पाटील, जयसिंग पाटील, तानाजी मदने व ग्रामस्थ उपस्थित होते. ही निवणूक प्रक्रिया तलाठी त्रिवेणी पाटील यांनी पार पाडली, तर ग्रामसेविका विद्या पाटील यांनी आभार मानले.