सामाजिक

भैरवनाथ मंदिराचा कलशारोहन सोहळा

पैजारवाडी प्रतिनिधी :-
भैरवनाथाच्या जयघोषात आणि ओम चिले दत्त नामाच्या गजरात सद्गुरू चिले महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या जेऊर (ता.पन्हाळा) येथे भैरवनाथ मंदिराचा कलशारोहन व चिले महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेचा नयनरम्य सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठया उत्साहात संपन्न झाला .
पहाटे चार पासून, सुरुवातीला के.डी.सी.सी. संचालक बाबासाहेब पाटील (आसुर्लेकर), दीपक यादव (बाबवंडे), महेश पेडणेकर (कोल्हापूर), नारायण पाटील (भागाईवाडी), व माजी सरपंच तुकाराम चिले (जेऊर) यांच्या हस्ते सपत्नीक होमहवन विधी वस्तू पूजा करण्यात आली. त्यानंतर चिले महाराज मूर्तीस विधिवत अभिषेक घातल्यानंतर करवीर पीठाचे जगतगुरु शंकराचार्य, धारेश्वर महाराज (पाटण), वाळवेकर महाराज (वाळवा), वाईकर महाराज (वाई), यांच्या शुभ हस्ते व दत्त संस्थान मोर्वीचे (ता.खंडाळा) हिंगमीरे महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत मूर्ती प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. या वेळी मूर्तीवर आणि कलशावर पुष्पवृष्टी करण्यात आली. हा सोहळा पाहण्यास व श्रीच्या दर्शनास भाविकभक्तांनी मोठी गर्दी केली होती. या सोहळ्यानिमित्त जगतगुरु शंकराचार्य व उपस्थित महाराजांनी आपल्या अमृतवाणीतुन सुस्राय प्रवचन दिले. या भक्तिमय वातावरणात भाविक श्रीच्या भक्तीरसात न्हाऊन गेले होते . यावेळी संगीत विशारद श्रीधर सुतार यांचे भावभक्ती गीतगायन कार्यक्रम, शाहीर शामराव खडके, शाहीर बाबासाहेब पाटील यांचा पोवाडा त्याचबरोबर शाहीर बळवंत चव्हाण (धामोडकर) यांचा कलगीतुरा (भेदक) असे कार्यक्रम संपन्न झाले.
महाराष्ट्र देवस्थान समितीचे सदस्य व शिवसेना शहरप्रमुख शिवाजी जाधव, व चिले महाराज समाधी मंदीर पैजारवाडी संस्थानचे विश्वस्त चंद्रप्रकाश पाटील (खुंटाळे) यांच्या हस्ते भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमास वारणा उद्योग समुहाचे अध्यक्ष विनय कोरे, गोकुळ संचालक विश्वास जाधव, माजी आमदार सुरेश साळोखे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाअध्यक्ष भगवान काटे, प्रवक्ते रमेश भोजकर, जि.प.सदस्य शिवाजी मोरे, जयसिंगपूर नगरसेवक चंद्रकात खामकर, पं.स.सदस्य अनिल कंदुरकर, पन्हाळा नगरसेवक चेतन भोसले, आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यास रंगराव डावरे, तानाजी पाटिल, दिलीप खांडेकर, शिवाजी डावरे, दिलीप घोसाळकर, अनिल बुवा, बाळ माने, किरण पाटील, महिपती पाटील, उत्तम पाटील, सरपंच सौ.प्रियांका महाडिक, उपसरपंच धोंडीराम पाटील, सर्व ग्रा.पं सदस्य, गावातील सर्व सार्वजनिक तरुण मंडळे, सहकारी संस्था/संघटना, व ग्रामस्थांनचे सहकार्य लाभले. आभार भीमराव पाटील यांनी मानले.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!