congratulationsसामाजिक

अनंत कोटी ब्रम्हाडनायक राजाधिराज योगीराज चिले महाराज की जय

पैजारवाडी प्रतिनिधी :-
अनंत कोटी ब्रम्हाडनायक राजाधिराज योगीराज चिले महाराज की जय
‘ भैरोबाच्या नावे चांगभलं ‘ च्या गजरात सद्गुरू चिले महाराज मूर्ती शोभायात्रा चे मोठ्या उत्साहात सकाळी पैजारवाडी येथून प्रस्थान झाले. प्रारंभी चिलेमूर्तीचे पूजन, चिले महाराज मंदिर संस्थानचे अध्यक्ष बाबासाहेब चव्हाण, बाबुराव गराडे,यांचे बरोबर भैरवनाथ देवस्थान अध्यक्ष सुभाष पाटील, सचिव तानाजी पाटील, विश्वस्त चंद्रप्रकाश पाटील, शिवसेना शहरप्रमुख शिवाजी जाधव, उत्तम नागवेकर, रंगराव डावरे यांच्या हस्ते पूजन होऊन, जेऊर कडे प्रस्थान झाले. या भव्य शोभायात्रेत धनगरी ढोल, झांजपथक, लेझीम पथक, हलगी, बैलगाड्या, घोडे,बँड असा पारंपरिक वाद्यासह पंचनद्याचे पवित्र जलकलश घेऊन दोनशे महिला सहभागी झाल्या होत्या. प. पू .चिले महाराज जन्मस्थळ व प्रमुख शक्ती पीठ असलेल्या जेऊर येथे सायंकाळी भव्य शोभयात्रेचे मंदीरात आगमन झाले.
यावेळी गावातील रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी, फुलांच्या पायघड्या व घरोघरी गुढ्या उभारण्यात आल्या होत्या. जेऊर ग्रामपंचायत तर्फे सरपंच सौ. प्रियंका महाडिक व उपसरपंच धोंडीराम पाटील यांनी शोभयात्रेचे स्वागत केले. या वेळी सार्वजनिक मंडळांतर्फे ठिकठीकाणी स्वागतकमानी उभ्या करण्यात आल्या होत्या, व सहभागी भावीकभक्ता साठी अल्पोपहार व चहापणाची व्यवस्था करण्यात आली होती. या शोभायात्रेत कोल्हापूर, सांगली, सातारा, मोर्वी, पैजारवाडी, आवळी, नावली, देवाळे, महाळूगे, तुरूंकवाडी, सह पंचक्रोशीतील अबाल वृद्ध भाविकभक्त मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. या सोहळ्यास खा. राजू शेट्टी, केडीसीसी संचालक बाबसाहेब पाटील, या मान्यवरानी भेट दिली, तसेच गावातील सर्व मंदिराना आकर्षक विद्युत रोषणाई करून रात्री शाहीर संजय जाधव मिनचेकर यांचा शाहिरी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास भाडळे सरपंच संभाजी पाटील, पैजारवाडी उपसरपंच सागर हिरवे, शरद चिले,, सुभाष खांडेकर, भीमराव पाटील आदी उपस्थित होते.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!