शित्तूर तर्फ मलकापूर च्या पोलीस पाटील पदी सौ.उज्वला गिरी
बांबवडे : शित्तूर तर्फ मलकापूर तालुका शाहुवाडी इथल्या पोलीस पाटील पदी सौ.उज्वला नामदेव गिरी यांची निवड झाली असून, परिसरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
गेल्या चार वर्षापासून इथले पोलीस पाटील पद रिक्त होते. म्हणून प्रांताधिकारी यांनी या पदासाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला. या पदासाठी लेखी व तोंडी परीक्षा सुद्धा घेण्यात आल्या. या दोन्ही परीक्षांमध्ये सौ.उज्वला गिरी या उत्तीर्ण झाल्या. शित्तूर तर्फ मलकापूर येथील त्या पहिल्या महिला पोलीस पाटील बनल्या. या अगोदर त्यांनी गावच्या सरपंच पदाची भूमिका यशस्वीरीत्या निभावली होती. या अनुभवाचा त्यांना या पोलीस पाटील पदासाठी चांगला उपयोग होणार आहे.
यासाठी त्यांना रामभाऊ कोकाटे, धनंजय पाटील, नामदेव गिरी, सुखदेव गिरी, तानाजी पाटील आदींचे मार्गदर्शन लाभले.