नावली च्या सरपंच पदी सौ.शीतल पाटील
पैजारवाडी प्रतिनिधी :-
नावली (ता पन्हाळा) येथील सरपंचपदी जनसुराज्य शक्ती पक्षाच्या सौ.शीतल भैरवनाथ पाटील यांची बिनविरोध निवड झाली. गटांतर्गत ठरल्याप्रमाणे सौ.राजश्री बर्गे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सरपंच पदाकरीत एकमेव अर्ज आल्याने सौ.शीतल पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचे, निवणूक अधिकारी पन्हाळा मंडलंअधिकारी श्री कोतेकर यांनी जाहीर केले.
यावेळी नूतन सरपंचाचा सत्कार पं.स.सदस्य अनिल कंदुरकर यांच्या हस्ते करण्यात आला.
या सरपंच निवडी निमित्त उपसरपंच विनोद पाटील, सदस्य संजय जाधव, माजी सरपंच राजश्री बर्गे, सुनीता घोलप, यांच्यासह राकेश पाटील, शिवाजी पाटील, संभाजी कराळे, विकास पाटील, व ग्रामस्थ उपस्थित होते. ही निवणूक प्रक्रिया तलाठी त्रिवेणी पाटील यांनी पार पाडली. व आभार ग्रामसेवक सागर पाटील यांनी मानले.