कापरी त गॅस्ट्रो सदृश लागण

शिराळा : कापरी(ता.शिराळा)येथे दूषित पाणी पिल्यामुळे नागरिकांना गॅस्ट्रो सदृश लागण झाली आहे. त्यापैकी काही रुग्णांना शिराळा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
गेले चार दिवसापासुन गावात रुग्ण आढळुन येत होते. आरोग्य विभागाने गावात सर्व्हे सुरु केला आहे.
येथील युवराज पाटील (३८), संगीता पवार (३२), रुक्मिणी पाटील(५०), नरेंद्र पाटील(२३), नामदेव पाटील(४३), बाबासाहेब पाटील(६९), जगन्नाथ पाटील (७०), रामराव पाटील(८० ), सुनील कुंभार(५०), कांचन सावंत ( ५५), रुक्मिणी कुंभार ( ६९), अनुराधा पाटील(१५), माधुरी पाटील (२२), अनुष्का पाटील(७ ), आयुष पाटील(९), मालन जाधव (६५), यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले.
चौकट- येथील साथ आटोक्यात आली असुन, साथ प्रतिबंधक उपाययोजना करण्यात आली आहे. आज रुग्णांची संख्या कमी झाली आहे. या साथीची कारणमीमांसा शोधण्याचे काम सुरु आहे.असे डॉं.एन.एम.घ़ड्याळे,तालुका आरोग्य अधिकारी,शिराळा यांनी सांगितले.

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!