कोडोलीत ”ख्रिस्त जन्मोत्सव सुवार्ता सभा २०१७” उत्साहात संपन्न
कोडोली वार्ताहर :
कोडोली ता.पन्हाळा येथे ख्रिस्तजयंती निमित्त आयोजित ”ख्रिस्त जन्मोत्सव सुवार्ता सभा २०१७” उत्साहात पार पडली.
किंग फॉरेव्हर ग्रुप,कोडोली यांनी आयोजित केलेली ख्रिस्त जन्मोत्सव सुवार्ता सभा कोडोली येथील महापुरे गल्लीतील बाजीगर चौक येथे २१ व २२ डिसेंबर असे दोन दिवस सुरू होती. या सुवार्ता सभेची सुरुवात देवाच्या प्रार्थनेने करण्यात आली. ख्रिस्त जन्मोत्सव सुवार्ता सभेस प्रमुख प्रवक्ते म्हणून इचलकरंजी येथील सियोन मिनिस्ट्रीजचे पा.शामकांत सर्वगोंडा लाभले होते. पा.सर्वगोंडा यांनी दोन दिवस सुरू असलेल्या सुवार्ता सभामध्ये जमलेल्या ख्रिस्ती बांधवाना अध्यात्मिक, तसेच जगामध्ये पाप वाढले आहे. तर पापापासून दूर राहून, प्रभू येशू ख्रिस्ताकडे वळा, असे सांगितले. तसेच पवित्र शास्त्रामध्ये लिहून ठेवले आहे, त्याप्रमाणे घडत असून, आकर्षित करणाऱ्या वस्तूंपासून दूर राहून, पवित्र शास्त्र प्रमाणे वागण्याबाबत मार्गदशन केले. या सुवार्ता सभेची सुरुवात प्रभू येशू ख्रिस्त स्तुती आराधना गाणी गाऊन करण्यात येत होती..या सुवार्ता सभेस कोडोलीसह आसपासच्या परिसरातील ख्रिस्ती बांधवांनी मोठया संख्येने हजेरी लावली होती….