देवाळे हायस्कुलचे जिल्हाप्रदर्शन साठी निवड
पैजारवाडी प्रतिनिधी :
देवाळे हायस्कुल देवाळे (ता.पन्हाळा) या विद्यालयातील गराडे के.जे.(प्रयोगशाळा सहाय्यक) यांचा परिचर गटात पणूत्रे (ता.पन्हाळा) या ठिकणी भरवण्यात आलेल्या तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये सादर केलेल्या फिरते प्रयोग स्टँड या उपकरनाचा प्रथम क्रमांक आला. या उपकरणाची जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली.
यासाठी त्यांना संस्थेचे चेअरमन डी.बी.पाटील, मुख्याध्यापक जी.डी.भोसले, सुपरवायझर एस.एस पाटील, विज्ञान प्रमुख सौ गोसावी व सर्व विज्ञान शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.