राजकीयसामाजिक

बांबवडे ( ता. शिराळा ) येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज ८५.९० टक्के मतदान

शिराळा प्रतिनिधी : बांबवडे ( ता. शिराळा ) येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज ८५.९० टक्के मतदान झाले. हे मतदान अत्यंत शांततेत व चुरशीने झाले. येथे दुरंगी लढत झाल्याने, जास्ती जास्त मतदान कसे होईल, यासाठी कार्यकर्ते दिवसभर धडपडत होते.
सरपंच पदाच्या दोन व पंधरा सदस्य पदाच्या उमेदवारांचे भवितव्य इव्हीएम मशीन मध्ये बंद झाले आहे. उद्या बुधवार दि.२७ डिसेंबर २०१७ रोजी तहसीलदार कार्यालयात सकाळी १० वाजता मतमोजणी होणार आहे .
प्रभाग १ मध्ये ४३० मतदारा पैकी ३८०, प्रभाग २ मध्ये ४८७ मतदारांपैकी ४३९, प्रभाग ३ मध्ये ४४५ मतदारांपैकी ३५१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ६४१ स्त्री मतदारा पैकी ५४६ तर, ७२१ पुरुष मतदारांपैकी ६२४ असे एकूण १३६२ पैकी ११७० ( ८५.९० टक्के ) मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला .
येथे राष्ट्रवादी व भाजपची युती विरूद्ध राष्ट्रीय काँग्रेस अशी लढत आहे. प्रभाग ३ मधून आशा धुमाळ व बाबासाहेब बनसोडे हे बिनविरोध निवडून आले आहेत
तहसीलदार दीपक शिंदे , निवडणूक नायब तहसीलदार सुहास घोरपडे यांचे मार्गदर्शनाखाली ही निवडणूक होत आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!