कापरी (ता.शिराळा) येथे गॅस्ट्रोच्या साथीमुळे जनता हैराण ,त्वरित उपाय करा-सत्यजित देशमुख यांचे आवाहन .

शिराळा प्रतिनिधी : आरोग्य विभागाने गॅस्ट्रोची साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करावेत. कापरी गावातील पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासून योग्य ती उपाययोजना करावी, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी केले.
कापरी (ता.शिराळा) येथे गॅस्ट्रोच्या साथीमुळे शिराळा उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची भेट घेवून विचारपूस केली . आरोग्य विभागास साथ आटोक्यात आणण्यासाठी योग्य ते प्रयत्न करण्याचे आदेश दिले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राम हंकारे यांच्याशी संपर्क साधून तात्काळ कापरी गावास भेट देण्याचे आदेश दिले. तसेच पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासून घेण्याच्या सूचना देत, ज्या ठिकाणी पाणी दुषित होत असल्याचा अंदाज आहे. त्या ठिकाणी तपासणी घेण्यात यावी. जिल्हा परिषद पाणी पुरवठा अभियंता बारटक्के यांनी पाईपलाईन व पाण्याची टाकी यांची तपासणी करावी, असे आदेश दिले.
उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची गैरसोय होत असल्याचे, रुग्णांकडून सांगण्यात आले. यावेळी रुग्णांची तक्रार येता कामा नये. आरोग्य विभागाने सतर्क राहून सेवा द्यावी, असे आदेश देशमुख यांनी दिले.
यावेळी तालुका कॉंग्रेस माजी अध्यक्ष हणमंतराव पाटील, तालुका कॉंग्रेस अध्यक्ष आनंदराव पाटील, माजी जि.प.सदस्य के.डी.पाटील, जिल्हा कॉंग्रेस सरचिटणीस एन.डी.पवार, डॉ.एम.बी.कांबळे, अमोल पाटील, सचिन पाटील उपस्थित होते.

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!