‘शामची आई’ पुस्तकाचे पारायण संपन्न

मलकापूर प्रतिनिधी :
ज्ञानाच्या मंदीरात आदर्श विचारांचं दान चिमुकल्या विद्यार्थ्याच्या मनावर बिंबवण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंत्री खुर्द, येथे शाम आई या पुस्तकाचे 18डिसेंबर ते 24 डिसेंबर या कालावधीत पारायण सोहळा संपन्न झाला .
शिराळा तालुक्यातील अंत्री खुर्द हे गाव गणपती बाप्पाचं आराध्य ठिकाण म्हणुन संपूर्ण महाराष्ट्रत प्रसिध्द असलेल्या, येथील प्राथमिक शाळेत उपक्रमशील मुख्याध्यापक विश्वास कुंभार यांच्यासह त्यांचे सहकारी अध्यापक आणि शाळाव्यवस्थापन समिती सदस्य यांच्यासह गावातील अनेक मान्यवरांच्या सहकार्याने शामची आई या पुस्तकांची उपल्बधता करण्यात आली .
आजकाल अनेक मनोरंजनाच्या माध्यमामुळे वाचनाकडे दुर्लक्ष होत आहे, आणि त्यातच अशा विशेष पुस्तकापासून ही विद्यार्थी दूर रहात आहेत, आणि म्हणून विद्यार्थ्याना थोरांच्या विचारांची ओळख व्हावी, या उदात्त हेतून मुख्याध्यापक विश्वास कुंभार व सहकारी शिक्षकांनी या पारायण यज्ञाचं आयोजन केलं होतं.
या शाळेतील 70विद्यार्थी आणि 30 पालक या पारायणात शामची आई पुस्तक वाचनास बसले होते. प्रत्येक ओळीचा अर्थ आणि वाक्याचा शब्द बोध अर्थ विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहचवला जात होता .
शैक्षणीक अभ्यासा बरोबरच अवांतर वाचन विशेष करून शामची आई या पुस्तकाच्या माध्यमातून विद्यार्थ्याना थोरांच्या विचारांची ओळख व्हावी, या हेतूनच हा ‘ शामची आई ‘ पुस्तकाचा पारायण सोहळा आयोजित केला असल्याचे, मत मुख्याध्यापक विश्वास कुंभार यांनी या वेळी व्यक्त केला. हा पारायण सोहळा संपन्न करण्यासाठी सरपंच सोनाबाई पाटील, उपसरपंच अरूण पाटील, शाळा व्यवस्थापन सदस्य गोरख मुळीक, शुभांगी मुळीक, जगन्नाथ गुरव, आदिसह अध्यापक प्रकाश पाटील, अध्यापिका सुनंदा पाटील, प्रमिला देसाई, शितल मुळीक, यांच्यासह पालकांचे अनमोल सहकार्य लाभले. व्यासपीठ चालक म्हणून मुख्याध्यापक विश्वास कुंभार यांनी वाचन केलं.

1+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!