शिराळ्यात दि.२५ व २६ जानेवारी रोजी होणाऱ अखील भारतीय शुटींग बॉल
शिराळा : येथे दि.२५ व २६ जानेवारी होणाऱ्या आखील भारतीय शुटींग बॉल स्पर्धेसाठी ची तयारी चालू असून याची माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी पाहणी केली . या स्पर्धेसाठी पंजाब , मध्यप्रदेश , उत्तरप्रदेश , राजस्थान , दिल्ली , गुजरात , महाराष्ट्र आदी राज्यातील तीस पेक्षा जास्त संघ तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू येणार आहेत.
शिराळा तालुका हॉलीबॉल प्रेमी संघटने मार्फत, माजी आमदार नाईक यांचे मार्गदर्शना खाली या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धा विश्वासराव नाईक महाविद्यालयाच्या क्रीडांगणा वर होणार आहेत. या स्पर्धेच्या तयारीची पाहणी आज करण्यात आली. दस्तागिर अत्तार , दीपक गायकवाड , रफिक अत्तार , माजी सरपंच देवेंद्र पाटील , उपनगराध्यक्ष किर्तीकुमार पाटील , संपत कुरणे , विश्वाप्रतापसिंह नाईक, सुजित यादव , वैभव गायकवाड , सुनील कवठेकर , राजू निकम , लालासाहेब तांबीट , लक्ष्मण मलमे , अशोक कुरणे , शिवाजी सवाईराम , राजू सदाफळे , महादेव कुरणे , भगवान लोहार , सचिन शेटे , विक्रम बिळासकर, आदी संघटनेचे पदाधिकारी यास्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील आहेत .