‘ वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ‘ चा ‘ विश्वास साखर ‘ ला उत्कृष्ट कार्यक्षमतेचा पुरस्कार

शिराळा प्रतिनिधी : चिखली ता. (शिराळा) येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्यास ‘ व्ही.एस.आय. ‘ कडून तांत्रिक कार्यक्षमतेचा पुरस्कार माजी केंद्रीय कृषिमंत्री, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरदश्चंद्र पवार यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
पुणे येथे झालेल्या ‘ वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ‘ च्या ४१ व्या वार्षिक सभा झाली. या सभेत ‘विश्वास’ कारखान्यास जाहीर झालेला दक्षिण महाराष्ट्रातील उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार माजी केंद्रीय कृषिमंत्री, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरदश्चंद्र पवारसाहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार मानसिंगराव नाईक, कार्यकारी संचालक राम पाटील, आनंदराव पाटील, दीपक पाटील, ए. एस. पाटील यांनी पुरस्कार स्वीकारला. या वेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, माजी मंत्री सर्वश्री दिलीप वळसे-पाटील, हर्षवर्धन पाटील, सतेज पाटील, राजेश टोपे, व्ही.एस.आय. चे डायरेक्टर जनरल शिवाजीराव देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page
error: Content is protected !!