नेबापूर येथे ख्रिस्तजयंती उसाहात साजरी

कोडोली वार्ताहर-
पन्हाळा परिसरात ख्रिस्तजयंती विविध उपक्रम तसेच उसाहात साजरी करण्यात आली. दिनांक ३० डिसेंबर रोजी नेबापूर ता.पन्हाळा येथिल १९७६ ची स्थापना असलेले रेव्ह. सुगंध सुमंत मेमोरियल चर्च,नेबापूर येथे आज ख्रिस्तजयंती, लहान मुलांचे ख्रिस्ती गाण्यावर डान्स, महिलांनी ख्रिस्ती गाणी तसेच नाटिका करून साजरी करण्यात आली.
यावेळी चर्चचे रेव्ह.प्रेत्रस सोरटे यांनी आरंभीची प्रार्थना करून सुरुवात केली. तर रेव्ह.जगन्नाथ हिरवे यांनी अध्यात्मिक मार्गदर्शन केले. तसेच नेबापूर मधील विधवा, गरीब, तसेच गरजू महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या. यावेळी रेव्ह. संजय धनवडे, रेव्ह. विश्वजित कांबळे, रेव्ह. आनंदराव माळूगेकर, पा.विनोद सावंत, पा.डेव्हिड यशवंत, पा.राजू माने, तसेच वडील लोक, चर्चेचे सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते..

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page
error: Content is protected !!