परखंदळे विद्यामंदिरास एल.सी. डी. वाटप
बांबवडे : परखंदळे तालुका शाहुवाडी इथं १४ व्या वित्त आयोगातून परखंदळे विद्यामंदिरास एल.सी. डी. वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच सौ. अश्विनी दळवी होत्या. परखंदळे विद्यामंदिर मध्ये पालक मेळावा, व एल.सी.डी. वाटप अशा संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना सरपंच सौ.अश्विनी दळवी म्हणाल्या कि, गावच्या शाळेच्या विकासासाठी केवळ शिक्षकांनी प्रयत्न करून चालणार नाही, तर त्याचबरोबर पालकांनी सुद्धा हातभार लावणे गरजेचे आहे. शाळेच्या विकासासाठी आपण सगळ्यांनीच एकजुटीने एकत्र येवू या,आणि शाळेच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू या, असे आवाहन सुद्धा सरपंच अश्विनी दळवी यांनी केले.
यावेळी मुख्याध्यापक भगवान पाटील सर, सय्यद सर, दिनकर पाटील सर, कुंभार सर,तसेच शेख सर आदींनी मनोगते व्यक्त केलीत.
या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य सुहास कोल्हापुरे, भीमराव परीट, पोलीस पाटील सदाशिव सुतार, केशव गावडे, बाबुराव सुतार, उत्तम दळवी, शशीकिरण दळवी, अनिल दळवी, चांदणी कांबळे, मयुरी गोंधळी, सजना गावडे, आदींसह पालक उपस्थित होते. शेख सर यांनी आभार मानले.