लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने तुकाराम खुटाळे यांचा सत्कार
कोल्हापूर : कोणत्याही कायदेशीर कामांसाठी कोणी लाच मागितल्यास, त्याबाबत न घाबरता लाचलुचपत प्रतिबंधक खात्याशी संपर्क करा, असे आवाहन पुणे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे महाराष्ट्र राज्याचे संचालक विवेक फणसाळकर यांनी केले.
पुणे इथं लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने काही मोजक्या तक्रारदारांचा सन्मान करण्यात आला. या सत्कार मूर्तींमध्ये खुटाळवाडी तालुका शाहुवाडी येथील तुकाराम खुटाळे यांचादेखील समावेश होता.
तुकाराम खुटाळे हे समाजशील असून नेहमीच अन्यायाच्या विरोधात उभे राहतात. याच अनुषंगाने त्यांनी देखील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला सहकार्य केले होते. याच अनुषंगाने त्यांचादेखील सन्मान करण्यात आला.
श्री फणसळकर पुढे म्हणाले कि, शेतकरी वर्ग व सामान्य जनता तक्रार करण्यास घाबरते,याचाच फायदा इतर मंडळी घेत असतात. तेंव्हा न घाबरता अशी काही घटना घडत असेल, तर या विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन देखील श्री फणसळकर यांनी केले. यावेळी पुणे विभागाचे पोलीस उपायुक्त संदीप दिवाण यांच्या हस्ते गौरव चिन्ह व प्रशस्तीपत्रक देवून सन्मान करण्यात आला.