मावळ प्रतिष्ठाण चा अभिनव उपक्रम
कोडोली वार्ताहर
नवीन वर्षाच स्वागत आपल्या पैकी बऱ्याच लोकांनी,कुटुंबा समवेत किव्हा मित्रांसोबत मौज मजा करून आणि मेजवानी करून साजरं केलं असेल.पण पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथील मावळा प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत आणि निसर्गाबदलची आपुलकी जपत एक अनोखा उपक्रम केलाय.या प्रतिष्ठानच्या वतीनं पावन गडावरील पक्षांना पाणी आणि धान्य पुरवण्याचा अनोखा उपक्रम या संघटनेन आजच्या १ जानेवारी या दिवशी नवीन वर्षाच स्वागत करत केलाय.प्रतिष्ठानच्या वतीनं मातीच्या भांड्यात धान्य आणि वेस्टज प्लास्टिक बाटल्या मधून त्यांच्या साठी पाणी ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.संघटनेच्या या उपक्रमाच स्वागत पन्हाळा परिसरातील बहुताऊनशी नागरिकांतून होत आहे.
सध्या शेतीची आधुनिक पद्धत ,कीटक नाशकांचा आणि रासायनिक खतांचा अधिक वापर या मूळ पक्षानं साठी खाद्य मिळन कठीण होत चाललय. तसेच वाढत शहरीकरण आणि पिकांच्या स्वरूपात होत चाललेल्या बदला मूळ आणि पश्चिम महाराष्ट्रात कमी त कमी श्रमात नगदी उतपन्ह मिळून देणार पीक म्हणून जास्तीत जास्त शेतकरी ऊस पिकाची लागण करत आहेत.या सर्व घटकांचा परिणाम म्हणून परिसरात वाढणाऱ्या चिमण्या आणि पक्षी नामशेष होऊ लागले आहेत। या बाबतीत आपली एक सामाजिक बांधिलकी म्हणून,मावळा प्रतिष्ठाणन वारणा परिसरातील लग्न समारंभ होणाऱ्या सभागृहातील वायफळ जाणार तांदूळ तसेच वारणा बझार सारख्या डिपार्टमेंटल स्टोअर मधून वायफळ जाणार धान्य संकलित करून ते साफ करून मातीच्या भांड्यातून पावन गडावरील पक्षी असणाऱ्या जगलमय परिसरात ते ठेवण्यात आले.तसेच याच परिसरात कचरा म्हणून टाकल्या गेलेल्या पाण्याच्या मोकळ्या बाटल्या संकलित करून त्या पक्षाना पाणी पीता येईल अशा कापून त्या मधून पक्षानां पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
बाईट:-संदीप पाटील
आजच्या तरुणांनी ३१ डिसेंम्बर आणि नवीन वर्षच स्वागत या नावाखाली जी हुल्लड बाजी चालू केली आहे त्यातून हजारो किलो धान्याची आणि पैशाची नासाडी होत आहे.त्या पेक्षा आशा पार्ट्याना बगल देत युवकांनी सामाजिक बांधिलकी जपत अशा वंचीत पक्षी जीवांना अन्न दान देणं ,ही मावळा प्रतिष्ठाणची योजना समाजाला प्रेरणा देणारी आहे म्हणून सेवा निवृत्त शिक्षक अनिल साखरपे हे देखील या उपक्रमात सहभागी झाले होते.
बाईट:- अनिल साखरपे
नवीन वर्षाच्या स्वागत करणाऱ्याया अभिनव उपक्रमामध्ये,मावळा प्रतिष्ठानने साधारण पणे १०० किलो धान्य संकलित केलं होतं आणि ते धान्य पन्हाळगडा शेजारील पावन गडावर पक्षानं साठी वितरित करण्यात आलं. पक्षांना पाण्याची सोय ही करून देण्यात आली.आणि ही योजना आजच्या एका दिवसात अवचैत्य साधून एवढ्या एकाच दिवसा पुरती मर्यादित रहाणार नसून दर १५ दिवसाला किंवा तीन आठवड्याला या पत्रात पुन्हा पाणी आणि धान्य भरलं जाणार असल्याचे मावळा प्रतिष्ठान चे अध्यक्ष संदीप पाटील यांनी सांगितलं. या वेळी पन्हाळ्याचे उपनगराध्यक्ष हारून मुजावर, कोडोली गावचे सरपंच नितीन कापरे, रवींद्र धडेल,डॉ.सवर्डेकर, निवास पाटील, निवास मामा पाटील आणि मावळ प्रतिष्ठिनचे सर्व सदस्य उपस्थि होते.