‘ पोलीस रायझिंग डे ‘
कोडोली वार्ताहर:-
परमेश्वर कृपेने आपल्याला या ठिकाणी यायला लागू नये, आणि काही कारणास्तव जर यावेच लागले, तर पोलीस ठाण्यात विभाग कसे आहेत, आणि पोलिसिंग कसे असते, या बाबत ची माहिती ‘ पोलीस रायझींग डे ‘ निमित्त,म्हणजे पोलिस उत्कर्षदिनानिमित्त कोडोली ता.पन्हाळा कोडोली पोलीस ठाण्यात, पन्हाळा शाहूवाडी विभागाचे पोलीस उपअधीक्षक आर.आर.पाटील यांनी जनतेशी संवाद साधताना दिली.
नुकत्याच पार पडलेल्या पोलीस रायझिंग डे निमित्त कोडोली ता.पन्हाळा पोलीस ठाण्यात पन्हाळा शाहूवाडी विभागाचे पोलीस उपअधीक्षक आर.आर.पाटील यांनी जनतेशी संवाद साधला. परिसरातील रिक्षावाले, व्यापारी, प्रवाशी वाहतूक करणारे वाहनचालक, विद्यार्थी वाहतूक करणारे वाहन चालक, महिला जेष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, पत्रकार आदी विविध सामाजिक घटकांशी श्री.पाटील यांनी संवाद साधला, आणि त्यांच्या समस्यांना उत्तर दिली. अधिकार क्षेत्रातील सर्व समस्या सोडवण्याच आवाहन ही त्यांनी या वेळी जनतेला दिले.
या वेळी कोडोली पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विकास जाधव यांनी लोकांच्या समस्यांना उत्तर दिली. तसेच पोलिसांच्या वतीनं नागरिकांना त्यांचे हक्क काय आहेत. त्यांनी पोलिस ठाण्यात आल्यानंतर काय केले पाहिजे, तक्रार कोठे नोंदवली पाहिजे, कोणाशी संपर्क साधला पाहिजे, आणि पोलीस स्टेशन मधली व्यवस्था काय आहे. कौन्सिलीग हॉल कोठे आहे , पोलिसांचे विश्राम स्थान कोठे आहे. कोठडी कोठे आहे. तिची अवस्था आणि व्यवस्था कशी आहे. या बाबतची माहिती पोलिसांनी नागरिकांना दिली. तसेच पोलीस ठाण्यातील शस्त्रांची आणि मद्यपीना शोधण्याचे ब्रिदीग मशीन आदी बाबतची ही माहिती त्यानी नागरिकांना दिली.