भिमसैनिकांवर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करा : शिराळा तहसीलदारांना भिमसैनिकांचे निवेदन

शिराळा,ता.३: भीमा कोरेगाव येथे विजय दिन साजरा करण्यासाठी गेलेल्या भीम सैनिकांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शिराळा तहसील कार्यालयावर, शिराळा तालुक्यातील भीम सैनिकांनी मोर्चा काढून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
अत्यावश्यक सेवा वगळता शिराळ्यात आज कडकडीत बंद पाळण्यात आला. एस.टी सेवा बंद करण्यात आल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.
रेड, खेड, तडवळे, उपवळे, औंढी, बिऊर, मांगले, कापरी, इंगरुळ, करमाळे, पुनवत या गावातून लोक मोर्चात सहभागी झाले होते.
मोर्चाची सुरुवात लक्ष्मी चौक येथून झाली.
यावेळी नगराध्यक्षा सुनंदा सोनटक्के, उपनगराध्यक्ष कीर्तीकुमार पाटील, चंद्रकांत निकम, बसवेश्वर शेटे, के.डी.पाटील, वासिम मोमीन, वसंत कांबळे, लालासो तांबीट, मंगेश कांबळे, अशोक दळवी, देवेंद्र पाटील, प्रशांत कांबळे, रमेश कांबळे, विजय दळवी, आनंद कांबळे, फिरोज मुजावर, सचिन बनसोडे, विनोद घाडगे, रोहित मोहिते, युवराज सातपुते, शशिकांत कांबळे, प्रकाश दळवी, विक्रम कांबळे, विनोद आढाव, सुहास कांबळे, प्रदीप शिवमारे, रमेश वाघमारे, संतोष सातपुते, राजेश शिवमारे उपस्थित होते.

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!