वारणा-कोडोली त पत्रकार दिन उत्साहात संपन्न
कोडोली वार्ताहर
आज दि.६ जानेवारी वारणा-कोडोली ता.पन्हाळा येथे पत्रकार दिन उसाहात साजरा करण्यात आला. मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी पाहिले ‘दर्पण’ नावाचे वृत्तपत्र सुरू केले होते. तेव्हापासून ६ जानेवारी हा पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो.
आज सकाळी वारणानगर येथील शारदा वाचनालय येथे वारणेचे जेष्ठ पत्रकार दिलीप पाटील यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे हार घालून पूजन केले. तसेच तात्यासाहेब कोरे इंग्लिश अॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांना शारदा वाचनालयाचे ग्रंथपाल पत्रकार बाबा कावळे यांनी पत्रकारितेबदल माहिती देऊन मार्गदशन केले. यावेळी वारणा तसेच कोडोली परिसरातील सर्व दैनिक, साप्ताहिक तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
६ जानेवारी पत्रकार दिनानिमित्त कोडोली ग्रामपंचायतवतीने पत्रकारांचा लेखणी देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कोडोली ग्रामपंचायतीचे सरपंच नितीन कापरे, उपसरपंच निखिल पाटील, ग्रामसेवक तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.