दि. १५ ते २६ जानेवारी पं.पु.सद्गुरू चिले महाराज पायी पालखी रथ सोहळा

पैजारवाडी प्रतिनिधी :
प्रतिवर्षी प्रमाणे सद्गुरू शंकर चिले महाराज सेवा मंडळ यांच्या वतीने आयोजित पं.पु.सद्गुरू चिले महाराज पायी पालखी रथ सोहळा सोमवार दि.१५ जानेवारी रोजी सद्गुरू चिले महाराजांचे जन्मगाव व प्रमुख शक्तीपीठ असलेल्या श्री क्षेत्र जेऊर येथील श्री भैरवनाथ मंदिरपासून सुरू होत असल्याची माहिती, भैरवनाथ व चिले महाराज मंदिर समितीचे अध्यक्ष सुभाष पाटील व सचिव तानाजी पाटील यांनी दिली.
सोमवार दि.१५ जानेवारी रोजी सकाळी भैरवनाथ, मसाई देवीच्या पाषाणास, तसेच चिले महाराजांच्या पादुका व मूर्तीस उद्योगपती अनुपशेठ गुप्ता (पुणे) यांच्या हस्ते महाभिषेक होईल. त्यानंतर दु.१२ ते ३ या वेळेत महाप्रसादाचे वितरण होणार असून, सायं.४ वा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडून पायी पालखी रथाचे मोर्वीकडे प्रस्थान होईल.
मंगळवार दि.१६ रोजी सकाळी चिले महाराज समाधी मंदिर श्री क्षेत्र पैजारवाडी येथून पायी पालखी रथ मार्गस्थ होऊन, केर्ली मार्गे कोल्हापूर सिद्धे्श्वर मंदिर पंचगंगा घाटावर मूक्कामी असेल.
बुधवार दि.१७ रोजी कोल्हापूर शहरात श्रीच्या पालखी रथाचे स्वागत होऊन हत्ती, घोडे, उंट, झांजपथक, ढोल अशा लवाजम्यासह आकर्षण मिरवणूक सपन्न होईल.
त्यानंतर त्र्यंबोली माता (टेबलाई) मंदिर येथे पालखी विसावा घेईल.
गुरुवार दि.१८ रोजी शिरोली टोप मार्गे वाठार (ता.हातकलंगले) येथे मुक्कामी थांबेल.
शुक्रवार दि.१९ रोजी कामेरी मार्गे मार्गस्थ होऊन पेठ (ता.वाळवा) येथे मुक्काम होईल, शनिवार दि.२० रोजी कासेगाव मार्गे कराड येथें तर रविवार दि.२१ रोजी उंब्रज मार्गे काशीळ (ता.कराड) येथे मुक्कामास असेल.
सोमवार दि.२२ रोजी अजिंक्यतारा साखर कारखाना मार्गे सातारा मध्ये विश्राती घेऊन मंगळवार दि.२३ रोजी लिंब फाटा मार्गे उडतारे येथे मुक्कामी थांबेल.
बुधवार दि.२४ रोजी कृष्णा नदीवर श्रीच्या पादुकांना स्नान व अभिषेक घालून, भुईंज मध्ये भव्य मिरवणूक होईल. पुढे
सुरुर मार्गे खंडाळा येथे मुक्काम होणार आहे.
गुरुवार दि.२५ रोजी म्हावशी मार्गे अहिरे (ता.खंडाळा) येथे मुक्काम, तसेच शुक्रवार दि.२६ रोजी दत्तमंदिर श्री क्षेत्र मोर्वी येथे पायी पालखी रथाचे भव्य स्वागत व मिरवणूक होणार असून, दत्त मंदिर संस्थान मोर्वेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ चव्हाण यांचे स्मरणार्थ भव्य ढोल-लेझीम स्पर्धा आयोजित केल्या आहेत. तसेच महाप्रसाद, भजन-कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रमा बरोबर या सोहळ्याच्या समारोप होईल.
या पालखी सोहळ्यात जेऊर, कोल्हापूर, रेठरे खुर्द, कोळीवाडी, उडतरे, अहिरे, कराड, फलटण, पुणे, मोर्वी ई. येथील भजनी मंडळ सहभागी होतील. त्याबरोबर कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, सातारा, पुणे, मुबंई, नाशिक ई जिल्ह्यातील हजारो भाविकभक्त या पायी पालखी सोहळ्यात मनोभावे सहभागी होणार आहेत.,
तरी चिलेभक्तांनी या पायी पालखी रथ सोहळयासाठी उपस्थित राहून श्रीच्या दर्शनाचा व आयोजित कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन भैरवनाथ व चिले महाराज मंदिर समितीने केले आहे .
यावेळी समिती उपाध्यक्ष रंगराव डावरे, विश्वस्त चंद्रप्रकाश पाटील (खुंटाळे), शिवसेना कोल्हापूर शहर प्रमुख शिवाजी जाधव, उत्तम नागवेकर आदी उपस्थित होते.

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!