पन्हाळा तालुका गटस्तरीय एम.सी.सी.स्पर्धेत आदर्श विद्यालयस घवघवीत यश
पैजारवाडी प्रतिनिधी :
मयूर बाग पन्हाळा या ठिकाणी घेण्यात आलेल्या तालुका गटस्तरीय एम.सी.सी.स्पर्धेत पन्हाळा-वाघवें गटामधून आदर्श विद्यालय आंबवडेच्या (ता.पन्हाळा) विद्यार्थ्यांनी एम.सी.सी.कवायत संचलन स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. तसेच बेस्ट गर्ल कॅडेट मध्ये अपूर्वा दिनकर लबडे इ.९ वी हिने द्वितीय क्रमांक तर बेस्ट बॉय कॅडेट म्हणून प्रणव पोपट भाकरे इ.९ वी याने त्रितीय क्रमांक पटकावला. या घवघवीत यशामुळे विद्यालयाचे व विद्यार्थ्यांचे सर्वांकडून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष राजाराम शिपुगडे, उपाध्यक्ष शंकररावं जगदाळे, सचिव सर्जेराव खुडे, मुख्याध्यापक संभाजी जाधव, क्रीडा शिक्षक संजय मोरे, सहा.शिक्षक संजय मगदूम, एकनाथ पोवार, सुशिला यादव, सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी व संचालक यांचे मार्गदर्शन लाभले.