सामाजिक

भारतीय जनता पार्टी चे विचार तळागाळात पोहचवा- आमदार शिवाजीराव नाईक

शिराळा प्रतिनिधी :
भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे विचार तळागाळात पोहचविण्याचे काम करून पक्षीय संघटन मजबूत करण्याचा सल्ला आमदार शिवाजीराव नाईक यांनी दिला.
येथील भाजपा युवा मोर्चा तालुका कार्यकारणी निवडीवेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे माजी सभापती उदयसिंग नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक, तालुकाध्यक्ष सुखदेव पाटील, सौ. वैभवी कुलकर्णी, विश्वासचे संचालक रणजितसिंह नाईक प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार शिवाजीराव नाईक म्हणाले, भारतीय जनता पार्टीचे विचार बूथ कमिटीद्वारे भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे विचार तळागाळात पोहचविण्याचे काम करून, पक्षीय संघटन मजबूत करावे. सर्व योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत करून द्यावा.
माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक म्हणाले, भाजपच्या पक्षीय संघटनेचे व्यवस्थापन अतिशय सूत्रबद्ध असून याद्वारे लोक कल्याणकारी योजना सर्व सामन्यापर्यंत पोहोचविण्यास मदत होते.
यावेळी निवडलेली युवा मोर्चा तालुका कार्यकारणी अशी तालुकाध्यक्ष सागर नाईक चिखली, उपाध्यक्ष वसंत पाटील मणदूर, अमित कुंभार सागांव, शरद गुरव गिरजवडे, पांडुरंग गायकवाड येळापूर, सचिन पाटील (पिनू) करमाळे, सरचिटणीस बाजीराव पाटील रिळे, विनोद पन्हाळकर कुसाईवाडी, चिटणीस रामचंद्र नायकवडी चरण, महादेव चौगुले मांगले, शरद माने बांबवडे, बाबासो जाधव मादळगांव, विकास शिरसट सावंतवाडी, कोषाध्यक्ष प्रवीण पाटील.
या निवडी प्रसंगी ग्लुकोजचे उपाध्यक्ष आनंदराव पाटील, रघुनाथ पाटील, सी. एच. पाटील, महिला मोर्चा शहराध्यक्षा सौ. रुपाली कदम, व्ही. टी. पाटील, प्रशांत पाटील, उत्तम पाटील, दत्ता पाटील, विजय पाटील, महेश पाटील, डी. के. पाटील, प्रकाश जाधव, संभाजी पाटील, अनिल पाटील, शिवाजी नांगरे, जयकर पाटील, एस. के. पाटील, बी. ए. पाटील, विजय महाडिक यांचेसह शिराळा विधानसभा मतदारसंघातील अनेक मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन रमेश गिरी यांनी केले, तर आभार रफिक आत्तार यांनी मानले.

*फोटो ओळी- भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सागर नाईक यांचा सत्कार करताना आमदार शिवाजीराव नाईक शेजारी रणधीर नाईक, सुखदेव पाटील, रघुनाथ पाटील आदि प्रमुख मान्यवर.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!