कोडोली पोलीस व मावळा प्रतिष्ठानने राबवली पक्षी बचाव, रिफ्लेक्टर मोहिम : नागरिकात समाधान
कोडोली वार्ताहर:-
कोडोली पोलीस ठाण्याच्या आवारातील असणाऱ्या झाडांवर बसणाऱ्या पक्षांना खाद्य व पाण्याची सोय मावळा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली. याच वेळी पोलीसांच्या सहकार्याने वारणानगर कोडोली ता.पन्हाळा मार्गावरील दुभाजकावर अपघात टाळण्यासाठी रेडियम रिफ्लेक्टर लावण्यात आले. या उपक्रमा बद्दल नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे.
वारणानगर ता.पन्हाळा येथील मावळा प्रतिष्ठानने नव वर्षाच्या प्रारंभा पासून पक्षी बचाव मोहिमेस पन्हाळा पावनगड येथून प्रारंभ केला आहे. प्रतिष्ठानच्या वतीने लोकसभागातून पक्षांना खाद्य ठेवण्यासाठी मातीचे तबक, पाणी ठेवण्यासाठी प्लास्टिक अर्धगोल कट केलेल्या पाण्याच्या बाटल्या झाडांच्या फाद्याना बांधण्यात आल्या आहेत.
पन्हाळ्यावरील या उपक्रमाने पक्षाची चांगली सोय झाली आहे. याच पध्दतीने कोडोली पोलीस ठाण्याच्या आवारातील पक्षांची खाद्य व पाण्याची सोय मावळा प्रतिष्ठानने केली आहे.