शोभा ताई कोरे यांना रत्नमाला घाई पुरस्कार
कोडोली वार्ताहर:-
सन १९६५ साली स्वतः च्या घरी पापडाचं पीठ नेऊन स्वतः पापड उद्योग सुरू केला, आणि नंतर या लघु उद्योगाला वारणा परिसरातील महिलांनी दाद दिली. आज हाच उद्योग परिसरातील महिलांचं प्रमुख उत्पन्नाचे साधन बनला आहे. असं वक्तव्य तात्या साहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा शोभाताई कोरे यांनी केले.
बहिरेवाडी ता.पन्हाळा येथील जाधव उद्योग समूहाच्या वतीनं आयोजित केलेल्या सत्कार समारंभात त्या बोलत होत्या. शोभा ताई कोरे यांना त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत नुकताच त्यांना रत्नमाला घाई पुरस्कार मिळाला. त्यांना हा सन्मान मिळाल्याबद्दल बहिरेवाडी येथील एच.आर. जाधव समूहातर्फे त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. या वेळी राज्य सेवेच्या उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल सुप्रिया सूर्यवंशी हिचा ही सत्कार समूहाच्या वतीनं करण्यात आला. या समारंभाला समूहाचे अध्यक्ष , एच.आर.जाधव, बहिरेवाडी गावचे सरपंच शिरीष जाधव, जयश्री जाधव , धनश्री जाधव आदी उपस्थित होते.