पन्हाळा तालुक्यात ‘ मनसे ‘ ची नवी कार्यकारिणी
कोडोली (प्रतिनिधी) :
कोडोली ता.पन्हाळा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोल्हापूर जिल्हा संपर्क अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्या आदेशाने व कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष गजानन जाधव व स्वाती ताई शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना, महिला आघाडी, विद्यार्थी सेनेची नविन निवड करण्यात आली.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संतोष जाधव, महिला जिल्हा उपाध्यक्ष .सिधुताई शिंदे, तालुका अध्यक्ष मोहन शेळके, सचिव यतिन होरणे, . पट्टण कोडोली शहर अध्यक्ष रवि आडके, तालुका उपाध्यक्ष नयन गायकवाड, शहर अध्यक्ष रमेश मेनकर, मनसेचे संजय पाटील उपस्थित होते.
नविन नियुक्ती
• महाराष्ट्र नवनिर्माण सेना फादर बॉडी शहर अध्यक्ष रमेश मेनकर,
• शहर उपाध्यक्ष केदार कुलकर्णी.
• विभाग अध्यक्ष विनोद महापुरे.
• शेतकरी सेना तालुका अध्यक्ष सुरेश पाटील.
• महिला आघाडी पन्हाळा तालुका अध्यक्ष सुवर्णा पोवार
• तालुका उपाध्यक्ष ज्योती खोत.
• कोडोली शहर अध्यक्ष मंगल सातपुते.
• विद्यार्थी सेनेचे कोडोली शहर अध्यक्ष संतोष पवार.
• विभाग अध्यक्ष निहाल मुजावर.
• कोडोली शहर उपाध्यक्ष विशाल आरडे
यांचा नविन नियुक्ती पञ देऊन सत्कार करण्यात आला.