Recentसामाजिक

कोल्हापूर च्या शिवाजी पुलावरून मिनी बस नदीत कोसळून भीषण अपघात : १३ जणांचा मृत्यू

कोल्हापूर : कोल्हापूर येथील शिवाजी पुलावरून मिनी बस पंचगंगा नदीत कोसळून झालेल्या अपघातात सुमारे १३ जणांचा मृत्यू ,तर ३ गंभीर जखमी झाले आहेत. हि दुर्घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडल्याने बचाव कार्यास उशीरा सुरुवात झाल्याची चर्चा नाग्रीकातून व्यक्त होत आहे. या दुर्घटनेमुळे शिवाजी पूल वहातुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
हि बस गणपतीपुळे हून पुण्याला निघाली होती. या बसध्ये एकाच कुटुंबातील १७ जण होते. जखमींना छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, जखमींवर उपचार सुरु आहेत. कोल्हापूरचे पालकमंत्री आणि महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात जावून जखमींना भेट आहे.
दरम्यान पंचगंगा नदी घाटावर लोकांची प्रचंड गर्दी झाली होती. पुलाचा मजबू कठडा तोडून बस पंचगंगा नदीत १०० फुट खाली खडकावर कोसळली .नदीकाठी राहणाऱ्या तरुणांनी तत्काळ पंचागंगेकडे धाव घेत, लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला.
मनीषा वरखडे (३८ ), प्राजक्ता नांगरे (१८ ), मंदार केदारी (५० ),यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर प्रतिक दिनेश नांगरे(१४ ), साहिल दिलीप केदारी (१४ ), गौरी संतोष वरखडे (१६ ) आणि ज्ञानेश्वर संतोष वरखडे या चार जणांचा मृतदेह मिळाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
बसमधील प्रवाशी हे बालेवाडी आणि पुण्याजवळील पिरंगुट गावाचे आहेत . हे सर्व केदारी आणि वरखडे कुटुंबातील लोक असून, हि दोन्ही कुटुंबे नातलग आहेत. गाडी बाहेर काढण्यासाठी मोठी क्रेन मिळत नसल्याने अडचणी आल्या मात्र आता गाडी बाहेर काढण्यात आली आहे. यावेळी जुना बुधवार पेठ तालीम मंडळ यांनी बचावकार्यात मदत केली.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!