विविध मागण्यांसाठी शिराळा तालुका रास्तभाव धान्य दुकान व केरोसीन दुकानदार संघटने चा मोर्चा
शिराळा प्रतिनिधी : रास्तभाव दुकानदारांना मानघन मिळाले पाहिजे. मानधन मिळणार नाही, तोपर्यंत पी.ओ.एस.मशिवर धांन्य वाटप करणार नाही, असे प्रतिपादन शिराळा तालुका रास्तभाव धान्य दुकान व केरोसीन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष महादेव कदम यांनी केले.
शिराळा तालुका रास्तभाव धान्य दुकान व केरोसीन दुकानदार संघटने च्यावतीने आपल्या विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर काढलेल्या मोर्चा बोलत होते.
मोर्चाची सुरुवात अंबामाता मंदिरापासुन करण्यात आली. यावेळी कदम म्हणाले, आम्हाला वाढीव कमिशन नको. पावतीवरच धान्य वाटप करणार. केसरी कार्ड धारकांना साखर, रॉकेल, तेल मिळाले पाहिजे. अन्न महामंडळ स्थापन करावे.
यावेळी संघटनेच्यावतीने नायब तहसीलदार उदय पवार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष बाजीराव पाटील, नौशाद सय्यद, विलास पाटील, अमोल आढाव, ए.ए.नायकवडी, दिलीप घाटगे, सुभाष मोरे उपस्थित होते.