सामाजिक

शिराळे वारुण येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार..

सोंडोली वार्ताहर :
शिराळे वारुण ता.शाहूवाडी येथील भगवान ढवळे यांच्या मालकीच्या दोन शेळ्या शिराळे वारूण हद्दीत नालगत नावाच्या जंगला लगत असणा-या शेतात बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्या. ही घटना मंगळवारी सांयकाळी पाच दरम्यान घडली. या घटनेचा पंचनामा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
घटनास्थाळावरुन मिळालेली माहीती अशी की, शिराळे वारुण येथील भगवान ढवळे यांचा शेळीपालन व्यवसाय आहे. ते रोजच्या प्रमाणे शेळ्या चारण्यासाठी गावाच्या हद्दीत असलेल्या नालगत नावाच्या रानात गेले होते. सांयकाळी पाचच्या दरम्यान अचानक शेळ्या पळू लागल्याने. ढवळे यांनी आपल्या शेळ्या एकत्र करुन पाहिले असता दोन शेळ्या गायब आसलेचे दिसून आले, पंरतु सांयकाळची वेळ असल्याने शोधा शोध केली. परंतु शेळ्यांचा पत्ता लागला नाही. पण दुसऱ्या दिवशी सकाळी जवळ झाडीत दोन शेळ्यां अर्ध्या खालेल्या अवस्थेत सापडल्याने, बिबट्यानेच मारल्याचे लक्षात आले.
या परीसरालगत मोठे जंगल असून उदगीरी , चादोंली अभयारण्य जवळ असल्याने या परीसरात जंगली प्राण्यांचा वावर वाढला आहे. यापूर्वीही शेळ्या व व ईतर जनावरे मारल्याच्या घटना घडल्या आहेत.
सध्या ऊस, मका पिके असल्याने येथे गवे , रानडुकरे रात्री येवून पिकांची नासधूस करत आहेत. यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. यावेळी घटनास्थळावर पंचनामा करण्यासाठी वनविभागाचे शित्तूर परिमंडल चे वनपाल मदने, वनरक्षक जी.डी.शिंदे, शंकर जाधव व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!