कोल्हापूर – मलकापूर मार्गावर पैजारवाडी येथील खड्डा भरला- ‘ एस पी एस न्यूज ‘ इम्पॅक्ट

पैजारवाडी प्रतिनिधी :-
कोल्हापूर – मलकापूर मार्गावर पैजारवाडी येथे पडलेल्या मोठ्या खड्या बाबत ‘ एस पी एस न्यूज ‘ वर वृत्त प्रदर्शित झाले होते .
या वृत्ताची दखल घेत आज राष्ट्रीय महामार्ग मंडळाकडून तो खड्डा डांबर व खाडीच्या सहाय्याने भरून घेण्यात आला.
या खडयामुळे गेल्या पाच दिवसामध्ये दुचाकींचे ११ अपघात होऊन ९ जखमी झाले होते .
या बातमी मुळे प्रशासन खडबडून जागे झाले, आणि तो खड्डा भरून घेण्यात आल्यामुळे प्रवाशी व नागरिकांच्याकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page
error: Content is protected !!