स्वप्नील पाटील यांचा अपघाती मृत्यू

पैजारवाडी प्रतिनिधी :-
देवाळे (ता.पन्हाळा) येथील स्वप्नील विश्वास पाटील वय १९ वर्ष या तरुणाचा मोटरसायकल घसरून, झालेल्या अपघातात उपचारा दरम्यान मृत्य झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
स्वप्नील आपल्या पत्नी स्वाती सह सासरवाडी करमाळा (ता.वाळवा) येथे मंगळवारी मोटरसायकल एम एच ०९ डी के ८५९५ वरून गेला होता. रात्री जेवण करून घरी परतत असताना, नऊ च्या सुमारास भटवाडी (ता.वाळवा)येथे कुत्रे आडवे आल्याने मोटरसायक घसरून अपघात झाला. या अपघातात स्वप्नील व स्वाती यांच्या डोक्याला जबर मार लागून गंभीर जखमी झाले. त्यांना इस्लामपुर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु स्वप्नील याची परिस्थिती अंत्यत नाजूक असल्याने त्याला कोल्हापूर येथे हलवण्यात आले. पहाटे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दुपारी शवविच्छेदन केल्यानंतर प्रतप्रेत नातेवाईकाना सोपवण्यात आले.
स्वभावाने मनमिळवू असणाऱ्या स्वप्नीलचे आठ महिन्यापूर्वी लग्न झाले होते. त्याच्या या दुर्देवी आकस्मिक अपघाती निधनाने देवाळे व परिसरातील गावामध्ये शोककळा पसरली.

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!