राजकीयसामाजिक

‘ विश्वास ‘ च्यावतीने महसूल क्रीडा स्पर्धेसाठी ५० हजाराची मदत

शिराळा प्रतिनिधी : चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याच्या वतीने कारखान्याचे अध्यक्ष व माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी पुणे येथे होणाऱ्या महसुल कर्मचाऱ्यांच्या विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी ५० हजाराची मदत देण्यात आली. कारखान्याचे कार्यकारी संचालक राम पाटील यांनी रक्कमेचा धनादेश शिराळा तहसिल कार्यालयातील नायब तहसिलदार आर. बी. शिद यांच्याकडे सुपुर्द केला. यावेळी मंडल अधिकारी प्रकाश सूर्यवंशी उपस्थित होते. माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी सामाजिक बांधिलकी जपत या स्पर्धेसाठी हा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. असे या वेळी कार्यकारी संचालक श्री. पाटील यांनी सांगितले.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!