दादांचे रोखठोक व्यक्तिमत्व प्रेरणादायी – नाम.दिवाकर रावते
बांबवडे : अनेक दिग्गज राजकारणी व्यक्तिमत्वांसोबत आपल्या राजकीय जीवनाची वाटचाल करणारे, माजी आमदार बाबासाहेब पाटील सरुडकर यांच्या अमृतमहोत्सव सोहळ्याला उपस्थित रहाण्याची संधी मिळाली, निश्चितच हे आमचे भाग्य आहे. कारण स्व. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, बाळासाहेब देसाई हि मंडळी राजकीय व्यासपीठावरील दिग्गज मंडळी होती. अशा मंडळींकडून राजकारणाचे धडे मिळणारे हे व्याक्तीमत्व निश्चितच उल्लेखनीय आहे. प्रामाणिकपणा, रोखठोक स्वभाव हि त्यांची वैशिष्ठ्ये निश्चितच अनुकरणीय आहेत. अशा बाबासाहेब पाटील दादा यांना दिर्घय्ष्य लाभो, असे मत प्रतिपादन राज्याचे परिवहन व खारभूमी मंत्री नामदार दिवाकर रावते यांनी केले.
सरूड तालुका शाहुवाडी इथं माजी आमदार बाबासाहेब पाटील सरुडकर यांचा अमृतमहोत्सव वाढदिवस लोकागृह्स्तव थाटामाटात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नामदार रावते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार निवेदिता माने उपस्थित होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नामदार दिवाकर रावते उपस्थित होते.
यावेळी अमृतमहोत्सव समितीच्या वतीने नामदार दिवाकर रावते यांच्या हस्ते जोतिबाची प्रतिमा देवून श्री बाबासाहेब पाटील सरुडकर यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
प्रारंभी विश्वास उद्योग समूहाच्या वतीने श्री मानसिंगराव नाईक यांनी सपत्नीक श्री बाबासाहेब पाटील यांचा सपत्नीक चांदीची निनाईदेवी ची मूर्ती देवून सत्कार केला. तसेच यावेळी विश्वास समूहाच्या वतीने त्यांना मानपत्र देण्यात आले. यावेळी श्री बाबासाहेब पाटील यांच्या जीवनावर लिहिलेल्या अमृतगंध पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकाचे लेखक के.ए. खातीब यांनी लिहिले असून अमरसिंह पाटील यांनी प्रकाशित केले.
यावेळी आमदार सत्यजित पाटील आपल्या प्रास्ताविकात म्हणाले कि, दादांनी आपल्या जीवनात राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्व दिले. म्हणूनच त्यांच्याभोवती कार्यकर्त्यांचे मोहोळ अधिक जमा झाले आहे. कोणताही राजकीय वारसा नसतानाही दादांनी केलेले समाजकारण अनुकरणीय आहे. दादांनी आपली राजकीय कारकीर्द समाजकारणासाठी वापरली.
यावेळी आमदार सुरेश हळवणकर म्हणाले कि, दादांनी आपले राजकीय आयुष्य समाजाच्या सेवेसाठी खर्ची घातले.
यावेळी विश्वास उद्योग समूहाचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक म्हणाले कि, दादांनी जनतेशी जोडलेली नाळ कधी तोडली नाही. विश्वास साखर कारखाना ज्यावेळी अडचणीत होता, तेंव्हा दादांनी केलेले सहकार्य विश्वास समूह कधीच विसरणार नाही.
यावेळी उदय साखर चे सर्व्हेसर्वा मानसिंगराव गायकवाड म्हणाले कि, दादांचे आणि आमचे वडील स्व.उदयसिंगराव गायकवाड यांचे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे होते. आम्ही देखील आमदार सत्यजित पाटील यांच्या सदैव पाठीशी राहू.
यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना माजी खासदार निवेदिता माने म्हणाल्या कि, दादांच्या कामाची पद्धत आम्ही जवळून पहिली आहे. कार्यकर्त्यांविषयी त्यांची तळमळ त्यांच्या कामाची साक्ष देत आहे. असे हे व्यक्तिमत्व आम्हाला नेहमीच प्रेरणादायी असेल.
यावेळी सत्काराला उत्तर देताना माजी आमदार बाबासाहेब पाटील सरुडकर म्हणाले कि, आयुष्याच्या या वळणावर मी समाधानी आहे. स्व. गायकवाड साहेबांनी राजकारणात आणले, आणि स्व. बाळासाहेब माने यांनी राजकारण कसे करावे ,हे शिकवले. यावेळी आपल्या आयुष्यातल्या अनेक कंगोऱ्यांना त्यांनी हात घातला. आपल्या भाषणाच्या शेवटी त्यांनी त्यांची पत्नी अनुराधाताई यांची प्रशंसा करत सांगितले कि, माझ्या पत्नीने मला आजवर संभाळले आहे. राजकारण करताना घरची सगळी जबाबदारी त्यांनी कुशलपणे पार पाडली.
कार्यक्रमाचे आभार युवराज पाटील यांनी मानले.