क्रिडाराजकीयसामाजिक

भेडसगांवच्या कुस्ती मैदानात योगेश बोंबाळे ची बाजी

बांबवडे : कोल्हापूर च्या गंगावेश तालमीतील योगेश बोंबाळे याने गुणांवर पुण्याच्या अक्षय शिंदे याला चीतपट करून एक नंबर ची कुस्ती मारली. तर भेडसगाव च्या अक्षय सूर्यवंशी याने कुंभी कासारी च्या विकी पाटील ला अस्मान दाखवल्याने भेडसगावकरांची छाती अभिमानाने फुलली. दोन नंबर ची कुस्ती संग्राम पाटील याने तर तीन नंबर ची कुस्ती गंगावेश च्या सिकंदर शेख याने गुणांवर कुस्ती जिंकली.
भेडसगांव तालुका शाहुवाडी इथं निलकंठेश्वर च्या महाशिवरात्री च्या यात्रेनिमित्त आज दि.१५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी अंगाई तळ्याच्या काठी कुस्ती चे भव्य मैदान संपन्न झाले. या मैदानाला प्रमुख पाहुणे म्हणून अमृतमहोत्सव वाढदिवसाचे मानकरी माजी आमदार बाबासाहेब पाटील सरुडकर उपस्थित होते.
तसेच या कार्यक्रमास भेडसगाव नागरी सह. पतसंस्थेचे सर्व्हेसर्वा जि.प. सदस्य हंबीरराव पाटील बापू यांनी या कुस्ती मैदानासाठी विशेष प्रयत्न केले.
या कुस्ती मैदानात विजयी झालेले मल्ल पुढीलप्रमाणे :
रामा चौगुले भेडसगांव , अमोल पाटील माणगाव,माणिक कारंडे कुंभी-कासारी, तुषार जाधव वाकुर्डे, साईराज पवार शिवारे, अमर लुगडे कापशी, बाळू घोडके कोल्हापूर, सुहास कणदूरकर वारणा आदी मल्लांनी बाजी मारली. तर या मैदानात एकमेव महिला कुस्ती संपन्न झाली. यात अस्मिता मोरे मोरेवाडी या मुलीने कुस्ती मारली.
या मैदानास माजी उपसभापती नामदेवराव पाटील सावेकर, जालिंदर पाटील रेठरेकर, भाजप चे अजितसिंह काटकर, पोपटराव दळवी सरकार बाळासाहेब पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते. या सर्व मान्यवरांचा सत्कार हंबीरराव पाटील बापू,व सरपंच अमरसिंह पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कुस्ती मैदानासाठी पंच म्हणून श्रीपती पाटील, वसंत पाटील, प्रकाश नलगे, रघुनाथ कदम, अमर सूर्यवंशी, दामाजी पाटील, जयसिंग लगारे, राजू पवार आदी वस्ताद मंडळी काम पहात होती.
दरम्यान कुंडल येथील अपघातात निधन पावलेल्या मल्लांच्या कुटुंबियांना मदत म्हणून मैदानात मदत पेटी फिरवण्यात आली. या पेटीत अनेक दानशूर दात्यांनी सढळ हस्ते मदत केली. या मैदानात प्रामुख्याने भेडसगांवचे युवा सरपंच अमरसिंह पाटील ( भैय्या ) यांच्यासह कुस्ती मैदानाचे संयोजन अध्यक्ष भोला कारंडे, उपाध्यक्ष विक्रम पाटील, सुनील पाटील खजिनदार यांच्यासह अनेक मान्यवरांनी संयोजन केले.
कुस्तीचे समालोचन दीपक वरपे म्हाळुंगे यांनी अगदी रांगड्या भाषेत केल्याने कुस्तीशौकिनांनी त्यांचे अभिनंदन केले.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!