‘ व्हॅलेंटाइन डे ‘ला पर्यावरणावर देखील प्रेम करा- कृष्णात पाटील
बांबवडे : १४ फेब्रुवारी तरुणाईचा महत्वाचा दिवस,तो म्हणजे ‘ व्हॅलेंटाइन डे ‘. परंतु डोंगर कपारीतील कानसा वारणा फौंडेशन व महाराष्ट्र राज्य ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन कोल्हापूर यांच्या वतीने पर्यावरण रॅली काढण्यात आली.
डॉ.एन.डी. पाटील महाविद्यालय च्या विद्यार्थ्यांसोबत पर्यावरण वाचवण्यासाठी काढलेली रॅली निश्चितच कौतुकास्पद आहे. डोंगर कपारीतील कानसा वारणा फौंडेशन आणि त्यांचे अध्यक्ष कृष्णात पाटील यांची सामाजिक बांधिलकी नेहमीच असे उपक्रम करत असते. परंतु महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये अशी बीजे पेरणे निश्चितच अनुकरणीय आहे. ज्याप्रमाणे ‘ व्हॅलेंटाइन डे ‘ ला प्रेमाचा संदेश दिला जातो, त्याचप्रमाणे पर्यावरणावर देखील असेच प्रेम करा,असा संदेश कानसा वारणा फौंडेशन चे अध्यक्ष कृष्णात पाटील यांनी दिला.
यावेळी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन कोल्हापूर चे श्री हरीश कांबळे, मलकापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अमोल केसरकर, तहसीलदार चंद्रशेखर सानप,पोलीस निरीक्षक अनिल गाडे, व महाविद्यालयीन विद्यार्थी व मान्यवर उपस्थित होते.