बांबवडे त संयुक्त शिवजयंती सोहळा दि.१९ ते २१ फेब्रुवारी : भरीव कार्यक्रमांचे आयोजन

बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं सर्व तरुण मंडळे, शिवभक्त व ग्रामस्थांनी मिळून संयुक्त बांबवडे शिवजयंती उत्सव साजरा करण्याचा अभिनंदनीय उपक्रम हाती घेतला आहे. या शिवजयंती चे औचीत्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
दि. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० वाजता शिवज्योत आणणे, व शिवप्रतिमेचे पूजन सकाळी करण्यात येणार आहे. यावेळी तरुणांनी सगळ्यांना दुध वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.
सकाळी ९.३० वाजता सायकल स्पर्धेचे आयोजन केले असून, हि स्पर्धा बांबवडे ते पिशवी मार्गावर होणार आहे. यासाठी प्रवेश फी ३००/- रु. ठेवण्यात आली असून, प्रथम बक्षीस ७००१/- रु. प्रायोजक – यशवंत सरपंच विजेते विष्णू यादव, बांबवडे गावचे उपसरपंच सयाजी निकम आहेत. द्वितीय बक्षीस ५००१/- रु. प्रायोजक श्री नामदेव गिरी शिवसेना उपजिल्हाप्रमुख, श्री सुरेश नारकर ग्रा.पं.सदस्य बांबवडे. तृतीय बक्षीस ३००१/- प्रायोजक- अभयसिंह चौगुले ग्रा. पं. सदस्य बांबवडे.
सायंकाळी ७.०० वाजता श्री किरण तुपे यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.
दि.२० फेब्रुवारी रोजी सकाळी १०.०० वाजता रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले असून, प्रवेश फी ५०.०० रु. आहे. प्रथम क्रमांक १५०१/-,द्वितीय क्रमांक १००१/-,तृतीय क्रमांक ५०१/-रु.ठेवण्यात आले असून, या बक्षिसांचे प्रायोजक महेश खुटाळे ( खुटाळे ज्वेलर्स )आहेत. या स्पर्धेवेळी स्पर्धकांनी स्वतःची रांगोळी स्वतः च आणायची आहे. हि स्पर्धा बांबवडे येथील महादेव मंदिरात संपन्न होईल.
सायंकाळी ४.०० वाजता धनगरी ढोल वाद्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. याची प्रवेश फी ५००/-रु. असणार आहे.यासाठी प्रथम बक्षीस ७००१/- रु. प्रायोजक श्री दिलीप बंडगर ,संचालक उदयगिरी संघ, द्वितीय बक्षीस ५००१/-रु. प्रायोजक बांबवडे सरपंच श्री. सागर कांबळे,व अमोल लाटकर.तृतीय क्रमांक ३००१/-रु.प्रायोजक श्री विनायक शिंदे ( मांगलेकर ).
दि.२१ फेब्रुवारीरोजी सकाळी ११.०० वाजता वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. यासाठी ई.५ वी ते १० वी चे विद्यार्थी च स्पर्धक असतील. विषय : छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज असणार आहे. प्रवेश फी ५०/-रु. आहे. यासाठी प्रथम बक्षीस १००१/-, द्वितीय बक्षीस ७०१/- रु. ,तृतीय बक्षीस ५०१/- रु. असून याचे प्रायोजक स्वप्नील घोडे-पाटील आहेत.
सर्व स्पर्धा चषक देणगीदार सौ.अश्विनी उत्तम दळवी सरपंच ग्रा.पं.परखंदळे.
दुपारी ४.०० वाजता श्रींच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणुकीत स्वराज्य ढोल ताशा पथक असणार आहे. दरम्यान शिवसुर्य मर्दानी खेळ,टोप यांचा कार्यक्रम होणार आहे. साऊंड ॐ दत्त चिले ॐ व आर.के. साऊंड बांबवडे. असणार आहे.
हा शिवजयंती उत्सव बांबवडे येथील सर्व तरुण मंडळे व शिव भक्तांनी व ग्रामस्थांनी आयोजित केला आहे.

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!