‘ मनसे ‘ ची नवी कार्यकारिणी जाहीर
बांबवडे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा-अध्यक्ष गजाननराव जाधव व तालुका प्रमुख कृष्णात दिंडे यांच्या हस्ते तालुक्यातील कार्यकर्त्यांची विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली. हा निवडी चा कार्यक्रम तालुकाप्रमुख कृष्णात दिंडे यांच्या निवास स्थानी पार पडला.
यावेळी सौ. फरजाना अल्लाबक्ष मुल्ला यांची मनसे च्या कोल्हापूर जिल्हा महिला उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे. याच बरोबर आनंदा शंकर विंगकर यांची शित्तूर-वारुण जि.प.मतदारसंघाच्या तालुका उपाध्यक्ष पदी, कृष्णात बापू पाटील यांची पिशवी जि.प. मतदारसंघाच्या तालुका उपाध्यक्ष पदी, मारुती राऊ खोत केर्ले यांची करंजफेण जि. प. मतदारसंघाच्या तालुका उपाध्यक्ष पदी, तसेच सतीश शिवाजी तेली यांची बांबवडे शहर अध्यक्ष पदी,तर विजय मारुती परीट यांची बांबवडे शहर उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
या सर्व नव नियुक्त पदाधिकाऱ्यांचे मनसे कार्यकर्त्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
यावेळी महादेव मुल्ला,सतीश तांदळे आदींसह मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.