भिडे गुरुजींचे व्याख्यान जोशपूर्ण वातावरणात हजारोंच्या उपस्थितीत संपन्न

बांबवडे : येथील संयुक्त शिवजयंती उत्सवानिमित्त आयोजित केलेले, आदरणीय भिडे गुरुजी यांचे व्याख्यान हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत जोशपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
या व्याख्यानामध्ये भिडे गुरुजींनी छत्रपती संभाजी महाराज यांची केवळ पुण्यतिथी न करता त्यांचा बलिदान मास पाळावा,असे आवाहनही श्री भिडे गुरुजी यांनी उपस्थित जनसमुदायास केले.
आपल्या व्याख्यानात भिडे गुरुजींनी संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांच्या जीवनावर अनेक प्रसंग उपस्थितांना पुराव्यासहित सांगितले.
दरम्यान ज्या डेमोक्रॅटिक संघटनेने सभा उधळून लावण्याचे आव्हान केले होते, त्याच्याबद्दल बोलताना गुरुजी म्हणाले कि, आम्हीही डेमोक्रॅटिक च आहोत, सभा उधळून लावणार असाल तर आत्ताच या, नंतर सभेत व्यत्यय नको. असे प्रती आव्हान देखील गुरुजींनी यावेळी केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे अनेक गुण गुरुजींनी सांगितले .अल्प काळात त्यांनी २८९ लढाया केल्या. त्यातील केवळ ९ लढायांमध्ये ते पराजित झाले,तर २८० लढाया ते जिंकले.
धर्मवीर संभाजीराजे यांच्या इतिहासाबद्दल बोलताना, राजांनी सोसलेल्या यातना त्यांनी आपल्या ओघवत्या वाणीतून जनसमुदायास सांगितल्यानंतर अवघा जनसमुदाय शोकाकुल झाला होता.
दोन तास सुरु असलेले व्याख्यान अतिशय शांततेत संपन्न झाले. यावेळी केवळ बांबवडे च नाव्ह्ये तर परगावाहून देखील युवक उत्साहाने उपस्थित होते. दरम्यान काही संघटनांनी केलेल्या स्टंटबाजीमुळे गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.
असे असतानाही हे व्याख्यान उत्साहात संपन्न झाले. यावेळी संयुक्त शिवजयंती उत्सव कमिटीचे कार्यकर्ते, ग्रामस्थ शिवभक्त यांनी शिस्तबद्ध वातावरणात कार्यक्रम संपन्न केला.

3+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!