शिराळ्याची आणखी एक चित्रकृती “लेझीम “

शिराळा प्रतिनिधी : भोपाळ येथे घेण्यात आलेल्या २२ व्या अखिल भारतीय बाल शैक्षणिक ऑडीओ- व्हिडिओ महोत्सव व आईसीटी मेला – २०१८ मध्ये ढाणकेवाडी (ता.शिराळा )येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक प्रवीण डाकरे यांच्या “लेझीम ” या लघुचित्रपटाला “बेस्ट व्हिडिओ प्रोग्राम-टीचर” हा राष्ट्रीय पुरस्कार अभिनेता व दिग्दर्शक मुकेश खन्ना यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. २० हजार रुपये, सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
हा महोत्सव दि. २२ ते २३ फेब्रुवारी रोजी भोपाळ येथे संपन्न झाला. या लघुचित्रपटात लेझीम या पारंपरिक लोककलेचा टिकवलेला वारसा व शाळाबाह्य मूल आनंददायी शिक्षणाच्या माध्यमातून शाळेत कसे रमले होते , याबाबत केलेले वर्णन हे प्रत्येकाच्या अंगावर शहारे आणते. विशेष म्हणजे बालकलाकार ओम बिबेकर ने केलेल्या अभिनयाने परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. या लघुचित्रपटात शिवाजीराव चौगुले, प्राजुली साळुंखे, हरिभाऊ घोडे, अरुण पवार, प्रविण डाकरे यांच्या प्रमुख भुमिका आहेत. संगीत दिग्दर्शन जयदिप डाकरे तर कथा, संवाद, दिग्दर्शन व निर्मिती प्रविण डाकरे यांनी केली आहे. यासाठी विद्या प्राधिकरण पूणे, सांगली मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे, गटशिक्षणाधिकारी मोहनराव गायकवाड, विस्ताराधिकारी बाजीराव देशमुख, केंद्रप्रमुख हरिभाऊ घोडे, मुख्याध्यापक अरुण पवार, शिक्षक सहकारी व ढाणकेवाडी ग्रामस्थांची प्रेरणा व मार्गदर्शन मिळाले. ग्रामीण भागातील शिक्षकाने केलेल्या या अनोख्या प्रयोगाबद्दल प्रविण डाकरे यांचे अनेक स्तरातून कौतुक होत आहे.
चौकट-शिराळ्याची लघुचित्रपटात हॅट्रीक
स्वच्छ भारत अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या लघुचित्रपट स्पर्धेत शिवाजीराव चौगुले दिग्दर्शित शिवरत्न व एंजिल्स फिल्मच्या खराटा व टमरेल या दोन लघुचित्रपटांचा सांगली जिल्ह्यात पहिला क्रमांक आला होता.आत्ता ‘ लेझीम ‘ चा पाहिलं क्रमांक आल्याने शिराळ्याची लघुचित्रपटाने स्पर्धेत हॅट्रीक मिळवली असल्याने, तालुक्यात उत्साहाचे वातावरण आहे.

2+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!