तालुक्यातील जनतेच्या जिव्हाळ्याच्या कामांना न्याय देणार – पैलवान विजय बोरगे जिल्हानियोजन मंडळ सदस्य
बांबवडे : सोनवडे फाटा ते साळशी या दरम्यानच्या रस्त्याला अखेर जिल्हापरिषद सदस्य व नियोजन मंडळाचे सदस्य असलेले पैलवान विजय बोरगे यांनी न्याय मिळवून दिला. दरम्यान उद्घाटनाचा कोणताही फार्स न करता, थेट काम सुरू करून सन्माननीय सदस्यांनी तालुक्यात एक नवा उपक्रमशील पायंडा पाडला आहे, त्यांच्या या कर्तुत्वामुळे साळशी व परिसरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
दरम्यान सोनवडे फाटा ते साळशी हा रस्ता, गेली अनेक वर्षे प्रलंबित होता. या रस्त्यामुळे राजकीय मंडळींना अनेकवेळा टीकेला सामोरे जावे लागत होते. परंतु जिल्हापरिषद सदस्य विजय बोरगे यांनी मात्र या रस्त्याचे काम सुरु करून अनेक चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
मतदारसंघातील तसेच शाहुवाडी तालुक्यातील इतर मतदारसंघातील सुद्धा जनतेच्या जिव्हाळ्याच्या कामांना प्राधान्य देवून, त्यांना आवश्यक असलेल्या विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देणारच ,असे ठाम वक्तव्य जिल्हा परिषद सदस्य विजय बोरगे यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना केले.
भविष्यात कामांच्या माध्यमातून जनतेसमोर जाणार असल्याचे, प्रतिपादनही पैलवान विजय बोरगे यांनी केले. यावेळी त्यांचे सहकारी उत्तम पाटील, विक्रम पाटील, बजरंग पाटील, हर्षवर्धन पाटील, तानाजी पाटील,रवींद्र पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.